नमस्कार शेतकरी मित्रांनो, भारत देश कृषिप्रधान देश आहे आणि शेती करत असताना शेतकऱ्यांना विविध अवजारांची किंवा उपकरणांची सतत गरज लागते. शेतकऱ्यांना आवश्यक असलेले अवजार प्रदान करण्यासाठी महाराष्ट्र सरकार कृषि विभागांतर्गत वारंवार नवीन योजना राबवत असते. या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि नाविन्यपूर्ण योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत, शेतकऱ्यांना मोफत फवारणी पंप दिले जातील, आणि तेही 100% अनुदानावर. मोफत फवारणी पंप या योजनेमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या दैनंदिन जीवनात शेतातील पिकांची फवारणी करण्यासाठी मोठा फायदा होणार आहे. महाराष्ट्र राज्यातील दुष्काळाच्या परिस्थितीचा विचार करता, शेतकऱ्यांना 100% अनुदानावर बॅटरीवर चालणाऱ्या फवारणी पंपांचे वितरण या योजनेच्या माध्यमातून करण्यात येत आहे. या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना अंतिम काही दिवस बाकी आहेत. सर्व शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न करावा आणि आपल्या जवळच्या शेतकऱ्यांना देखील ही माहिती पोहोचवावी, जेणेकरून ते देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतील. या योजनेचा लाभ घेण्यासाठी वर दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
मोफत फवारणी पंप योजना 2024
Advertising
Advertising
Advertising
Advertising